Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेडोनाने कमावली 5 हजार कोटींची संपत्ती

मेडोनाने कमावली 5 हजार कोटींची संपत्ती
, बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (13:12 IST)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका मेडोनाला आपला आदर्श मानते. प्रियांका चोप्रा इंटरनॅशनल सिंगिंगमध्ये आपले करिअर बनवत आहे. बालपणापासून मेडोनाची चाहती असल्याचे प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले होते. याच निमित्ताने जाणून घेऊया मेडोना का नवोदित गायकांची आदर्श ठरली आहे. म्युझिक शोमधून कमाई करणार्‍या गायकांमध्ये मेडोना सर्वात पुढे असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. तिने मागील दहा वर्षात अब्जो रुपये कमावले आहेत. म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ पॉप’ म्हटले जाते.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मेडोनाच्या नावाची नोंद ‘बेस्ट सेलिंग फिमेल आर्टिस्ट’च्या रुपात आहे. एका वेबसाइटच्या मते, मेडोनाने मागील दहा वर्षात जगभरातील विविध शहरांमध्ये अडीचशेहून अधिक शो करुन तब्बल 80 कोटी डॉलर (जवळपास पाच हजार कोटी रुपये)ची कमाई केली आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने मेडोनाला सर्वाधिक कमाई करणारी गायिका म्हणून संबोधित केले होते. ती आपल्या एका शोसाठी तब्बल वीस कोटींचे मानधन घेते. मेडोनाचे जगभरात असंख्य चाहते आहेत. शोमधील तिचा डान्स, म्युझिक, लायटिंग, कॉश्र्चुम आणि स्टेज सर्वकाही आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. आतापर्यंत तिच्या शोमध्ये तब्बल 63 लाख लोक सहभागी झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi