Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैदानावरच्या हिरोची आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री

मैदानावरच्या हिरोची आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री
, सोमवार, 8 सप्टेंबर 2014 (13:55 IST)
क्रिकेट जगतात अनेक दिग्गज बॅटस्मनला हैराण करून टाकणारा ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली लवकरच मोठय़ा पडद्यावर धम्माल उडवून द्यायला सज्ज झालाय. ब्रेट ली एका रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणार आहे. ‘ऑस्टेलिया इंडिया फिल्म फंड’चा (एफआईएफएफ) पहिला सिनेमा ‘अनइंडियन’द्वारे ब्रेट ली सिनेजगतात पाऊल टाकतोय. या सिनेमाचं प्रमोशन ऑक्टोबरपासून सिडनीमध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाची घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अँबॉट यांनी केलीय.

‘एफआईएफएफ’ची स्थापना भारतीय थीम असणार्‍या ऑस्ट्रेलियन सिनेमांना पैसा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं 2013 मध्ये करण्यात आली होती. ‘ब्रिक लेन’ या चित्रपटामधून स्वत:ची ओळख निर्माण करणारी तनिष्ठा चॅटर्जी या चित्रपटात ‘ब्रेट-ली’ची हिरोईन असणार आहे.

या चित्रपटाची कथा तुसी साथी यांनी लिहिलीय तर अनुपम शर्मानी याचं दिग्दर्शनं केलंय. क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालणारा ब्रेट ली रुपेरी पडद्यावर काय करिश्मा दाखतो? याची त्याच्या सगळ्याच चाहत्यांना उत्सुकता लागलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi