Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेडी गागाने फेटाळला मॅडोनाचा प्रस्ताव!

लेडी गागाने फेटाळला मॅडोनाचा प्रस्ताव!

वेबदुनिया

PR
जागतिक स्तरावरील अव्वल 'पॉपसिंगर' लेडी गागाने मॅडोनासोबत एका कार्यक्रमादरम्यान, गाणे गाण्याच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवित तिच्यासोबतची जुने वैर संपुष्टात आणण्याची चांगली संधी दवडली आहे. मॅडोनाने गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमधील यानकी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात भाग घेण्यासंदर्भात एक प्रस्ताव गागाला पाठविला होता. सन ऑनलाईच्या वृत्तानुसार, गागाने 'बॉर्न धिस वे बॉल' या कार्यक्रमातील व्यस्ततेचा हवाला देत मॅडोनाचा प्रस्ताव स्वीकार केला नसल्याचे म्हटले.

गागाचे व्यवस्थापक विनसेंट हॉबर्ट यांनी सांगितले की मॅडोनाने आपल्यासोबत यानकी स्टेडियमवर एक कार्यक्रम सादर करण्याचा प्रस्ताव गागासमोर ठेवला होता. यासाठी मॅडोनाच्या व्यवस्थापकाने गागाशी संपर्कही साधला होता पण गागाने त्या प्रस्तावाला स्वीकारले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi