वनिसाने उघडले कमनीय बांध्याचे गुपित!
आयुष्यातील 40 वर्षे उलटल्यानंतरही आपला कमनीय बांधा जसाच्या तसाच टिकवून ठेवणार्या फ्रान्सची मॉडेल तथा अभिनेत्री वनिसा पॅराडाईसने तिच्या कमनीय बांध्याचे गुपित उघडले आहे. संगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणार्या वनिसाने म्हटले, की योगामुळेच शरीरयष्टी पूर्वीसारखीच आजही टिकवून ठेवता आली. डेल मेलच्या वृत्तानुसार, पॉप स्टार वनिसाने आजही तिचे पूर्वीचे सौंदर्य टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. तरुणपणी ती जेवढी सुंदर व आकर्षक दिसत होती तसेच योगामुळे ती आजही तेवढीच सुंदर दिसून येत आहे.