Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शकिराच्या ‘ला.ला..ला’ ची नेटिझन्सना भुरळ

शकिराच्या ‘ला.ला..ला’ ची नेटिझन्सना भुरळ
, गुरूवार, 27 मार्च 2014 (15:20 IST)
पॉप स्टार शकिरानं ब्राझीलमध्ये होणार्‍या फुटबॉल वर्ल्डकपसाठी तयार केलेलं ला.. ला.. ला.. हे थीम साँग सध्या इंटरनेटवर चांगलंच धूम ठोकत आहे. या गाण्याला फेसबुकवर सर्वाधिक 86.3 मिलियन चाहत्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळं शकिराचं ला.ला.ला. हे थीम साँग फेसबुकवरचं सर्वात हीट गाणं ठरलं आहे. चार वर्षापूर्वीच दक्षिण आफ्रिकेतील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा शकिराच्या वॅका. वॅका.. साउथ आफ्रिका हे थीम साँग सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. आता त्यापाठोपाठ ब्राझील विश्वकरंडक स्पर्धेसाठी शकिरानं तयार केलेलं ला.. ला.. ला.. हे थीम साँगही सुपर हीट होत आहे. सध्या फेसबुकच्या हीटलिस्टमध्ये शकिरा 86.3 मिलियन म्हणजे भारतीय आकडय़ांनुसार 86 कोटी 30 लाख चाहत्यांसह सर्वोच्च स्थानावर आहे. त्यात जशी फुटबॉल वर्ल्डकपची धुंद चढत जाईल, तशीच शकिरा हे थीम साँगही नव-नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल अशी शक्यता आहे. त्यामुळं जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी सध्या शकिराचं ला.. ला.. ला.. हे गाणं म्हणजे प्रार्थनेसमानच असल्याचं भासत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi