बॉलिवूड एकदा परत हॉलिवूडवर भारी पडलंय. हे शक्य झालंय बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान मुळे. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स टीमचा मालक असलेला ४८ वर्षीय शाहरूखनं यानं हॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम क्रूझ आणि जॉनी डेप यांना मागं टाकून अव्वल स्थान पटकावलंय.
शाहरुख `वेल्थ-एक्स` यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची संपत्ती ६० कोटी डॉलर नोंदविण्यात आली आहे, तर कॉमेडियन जेरी साइनफिल्ड हा श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याची संपत्ती ८२ कोटी डॉलर आहे. टॉम क्रूझ तिसऱ्या स्थानावर असून, त्याची संपत्ती ४८ कोटी डॉलर आहे. यादी करताना मालमत्तेचं मूल्य विचारात घेण्यात आलं होतं.