हॉलिवूडचे सुपरस्टार ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली हे अतिशय प्रसिद्ध जोडपं. मात्र हे जोडपं आता वेगळं होण्याचं विचार करत असल्याची माहिती आहे. दोघांचा घटस्फोट झाला तर अख्या हॉलिवूड विश्वासाठी ही धक्कादायक घटना असेल. 11 वर्षापूर्वी दोघं सोबत आहेत. त्यांना एकूण 6 मुलं आहेत. 7 वर्ष लिव्ह इन रिलेशननंतर दोघांची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर 17 महिन्याअगोदरच त्यांनी विवाहदेखील केला होता.
दोघंही एकमेकांना योग्य वेळ न देऊ शकत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दोघेही सध्या वेगवेगळ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.