हॉलिवूडवर शोककळा; अभिनेता फिलिप हॉपमनचा मृत्यू
ऑस्कर पुरस्कार विजेता हॉलिवूड अभिनेता फिलिप सिमोर हॉफमन यांचा मृत्यू झाला आहे. ते 46 वर्षाचे होते. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. हॉपमन यांच्या अकाली मृत्युमुळे हॉलिवुडवर शोककळा पसरली आहे. न्यूयॉर्कमधील त्यांच्या अपार्टमेंटमधील बाथरुममध्ये ते मृतावस्थेत आढळले. यावेळी त्यांच्या हाताला इंजेक्शनची सुई होतं. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांच्या घरातून हिरॉईनही जप्त केले. हॉपमन यांच्या मृत्युच्या कारणांचा तपास सुरु आहे. दरम्यान, फिलिप हॉपमन यांना 'कॅपोट' चित्रपटातील दमदार अभिनयासाठी 2005मध्ये ऑस्करने गौरवण्यात आले होते.