फेब्रुवारी २०२६ हा महिना ग्रहांच्या चालीमुळे नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि नातेसंबंधांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
१. मेष (Aries): महिन्याची सुरुवात संघर्षाची असेल, मेहनतीचे फळ मिळण्यास उशीर होईल. दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती सुधारेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. आर्थिक स्थिती महिन्याच्या शेवटी सुधारेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
२. वृषभ (Taurus): खर्च वाढल्यामुळे बजेट बिघडू शकते. करिअरमध्ये दुसऱ्या आठवड्यात कामाचा दबाव आणि विरोधकांचा त्रास संभवतो. महिन्याच्या मध्यानंतर नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटेल.
३. मिथुन (Gemini): महिना धावपळीचा राहील. भागीदारी व्यवसायात पैशांच्या व्यवहाराबाबत सावध राहा. घाईने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. महिन्याच्या शेवटी कौटुंबिक जीवनात काही कुरबुरी होऊ शकतात, पण कुटुंबाची साथ मिळेल.
४. कर्क (Cancer): अडकलेली कामे पूर्ण होतील. कोर्ट-कचेरीच्या कामात दिलासा मिळेल. पदोन्नती किंवा व्यवसायात फायद्याचे योग आहेत. महिन्याच्या मध्यात अचानक खर्च वाढतील. बोलण्यावर संयम ठेवणे गरजेचे आहे.
५. सिंह (Leo): हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला असेल. आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
६. कन्या (Virgo): सुरुवात मेहनतीची असेल. अहंकारामुळे नुकसान होऊ शकते, त्यामुळे नम्र राहा. महिन्याच्या उत्तरार्धात मोठे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी प्रगतीच्या संधी आहेत.
७. तूळ (Libra): महिना सामान्य राहील. सरकारी कामात किंवा ऑफिसमध्ये स्वतःचे काम इतरांवर सोपू नका. तिसऱ्या आठवड्यापासून आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती दिसेल. नातेसंबंधात चढ-उतार येतील.
८. वृश्चिक (Scorpio): सुरुवातीला प्रवास आणि धावपळ होईल. महिन्याच्या मध्यात कौटुंबिक चिंता सतावतील. मात्र, महिन्याच्या शेवटी नशिबाची साथ मिळेल आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
९. धनु (Sagittarius): प्रगतीचा महिना आहे. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. प्रभावशाली व्यक्तींच्या मदतीने अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील.
१०. मकर (Capricorn): करिअरच्या योजना यशस्वी होतील. घरात शुभ कार्य किंवा लग्नाचे योग जुळून येतील. महिन्याच्या मध्यात व्यवसायात थोडी सुस्ती जाणवेल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.
११. कुंभ (Aquarius): हा महिना अतिशय सकारात्मक आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नवीन भागीदारीतून व्यवसायात फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि प्रेम जीवनात ताळमेळ चांगला राहील.
१२. मीन (Pisces): महिना संमिश्र स्वरूपाचा असेल. दुसऱ्या आठवड्यापासून कामाचा ताण वाढेल. महिन्याच्या शेवटी आरोग्याकडे आणि वाढत्या खर्चाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये घाईने निर्णय घेऊ नका.
सूचना: ही माहिती सामान्य ज्योतिषशास्त्रीय अंदाजांवर आधारित आहे. वेबदुनिया याची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.