या मातीला ठाऊक सारे, इथे वाहिले वादळ वारे
आकाशातील अवघे न्यारे, इथे तळपुनी गेले तारे....
या मातील ठाऊक सारे
निराकार नि:श्वसनामधुनी, आदि आदि हुंकार उमटले
ऋक-सामातुन या मातीवर, विराट पुरूषा वंदन घडले....
ज्ञानीयांनी तत्वज्ञांनी, मंत्रट्रष्ट्या ऋषिवर्यांनी
उपनिषदांची अरण्यकांची, इथे उभविली ऊंच मंदिरे
ऊंच मंदिरे...
या मातीला ठाऊक सारे....
या मातीच्या कणाकणातुन, आंदोळुनि आकाश गर्जले
एक गर्जना-कृण्वन्तो विश्वमार्यम् !
बलवंतांच्या बलिदानातुन, पानोपानी इतिहासातुन
कितीक लढता गेले दाहीर, रक्ताचे वाहवून सागर !
वाहवून सागर....!
त्या रक्ताने भिजली माती, रणवीरांची साक्ष जागती
बुरूज गडकोटांचे गाती, शिवरायांदी बुलंद कीर्ती
तोफांच्या त्या जयगानाने, थरारून हे दिग्गज उठले...
दिग्गज उठले !