Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिरंगा फडकवण्याचे हे नियम, जाणून घेणे आवश्यक

तिरंगा फडकवण्याचे हे नियम, जाणून घेणे आवश्यक
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (12:14 IST)
तिरंगा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. 
झेंडा आयताकार असायला हवा. याची लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. 
तिरंग्याला बिगुलच्या आवाजासोबत फडकवले जावे आणि उतरवले जावे.
फाटलेला तिरंगा फडकवू नये. मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. 
सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो. 
विशेष घटनांच्या वेळी तिरंगा रात्रीही फडकवला जाऊ शकतो.
एखाद्या कारवर तिरंगा लावताना तो मधोमध किंवा गाडीच्या उजव्या बाजुला असावा
तिरंग्याला पाण्यात किंवा फरशीवर पडलेला ठेवता कामा नये
झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. 
तिरंगा वस्त्र म्हणून वापरणे किंवा मृतदेहाभोवती तिरंगा गुंडाळणे (शहीद जवान वगळून) तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.
तिरंग्यावर काहीही लिहिण्यास किंवा छापण्यास मनाई आहे.
सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. 
गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. 
तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे.
तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.
तिरंगा केवळ दुखवट्याच्या वेळीच अर्ध्यावर उतरवला जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या पाश्वर्वभूमीवर पुणेकरांसाठी गणपती विसर्जनाबाबत नविन नियम