Article Independence Day Marathi %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8 111081400008_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिन
WD
कार्यालयाच्या प्रागणांत प्रवेश करताच स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असल्याचे लक्षात आले. आमच्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील कठड्याची रंगरंगोटी सुरु होती. लहान मुलांचे केस नीट लावून देणाऱ्या आईसारखे बागेतील माळी कार्यालयासमोरील झाडांना व्यवस्थित करीत होते. हे सगळ पाहतांनी एकीकडे मैदानावर पोलीस कर्मचाऱ्यांची परेडही सुरु होती.

दरवर्षी स्वातंत्र्यदिन येतो. दरवर्षी सण, उत्सव येतात. मात्र स्वातंत्र्यदिन आला की आजूबाजूचे वातावरण बदलून जाते. कुठे वंदे मातरम, तर कुठे जन गण मन चे सुर ऐकू येतात. स्कॉऊट गाईड, एन.सी.सी. बालवीर, वीरबालांची पथके संचलनासाठी तयारीला लागतात. स्वातंत्र्यदिन सोहळा म्हटला तर नित्याचाच भाग झाला आहे. मात्र मनात एक विचार आला की, संपूर्ण भारत देशाला स्वातंत्र्य या शब्दाची दैवी भेट मिळाली. मात्र यासाठी कितीतरी जणांना आपले बलिदान द्यावे लागले.

आज क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान म्हणजे यदांचा विश्वकप जिंकतांना पूर्ण देशातील वातावरण, जल्लोष डोळ्यासमोर आला. आनंदाने अभिमानाने भरुन आलेली सगळ्या देशवासीयांचे चेहरे तेव्हा प्रत्यक्षात, टि.व्ही.वर व वृत्तपत्रातून दिसून येत होते. स्वातंत्र्याची चळवळ किंवा युद्ध आमच्या पिढीला अनुभवण्याचे भाग्य लाभले नाही. त्यामुळे कदाचित स्वातंत्र्याची किंमतही आम्हाला कळली नाही. स्वातंत्र्य म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्य अशीच आमची धारणा झाली आहे. रविंद्रनाथ टागोराची इन द हेवन ऑफ फ्रिडम नावाची सुंदर कविता वाचली तेंव्हा कळलं की, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे शिस्त. विश्वकप जिंकण्याचा आनंद असो किंवा कारगिलमध्ये शहीद झालेले जवान असो किंवा अगदी अलिकडच्या बॉम्ब स्फोटानंतर झालेल्या एकजूटीचे दर्शन असो. वैविध्यांनी लढलेला आपला देश हा जगात एकमेव असा देश आहे. ज्याच्या नावापुढे भारतमाता असे संबोधन लावल्या जाते. यंत्र, तंत्र व मंत्र यांचा अनोखा संगम असलेला फक्त भारतच आहे. की सगळीकडे अंधकार आहे. मात्र अशाही परिस्थितीत अनेक सामान्यातून असामान्य असलेल्या व्यक्ती पुढे येतात.

भारतात तर लता मंगेशकर, डॉ.कलाम, सचिन तेंडुलकर, अर्थतज्ज्ञ व पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग, ऑलिंपिक गोल्डमेडल मिळविलेला अभिनव ब्रिंदा, समाजसेवक अण्णा हजारे, संगणक तज्ज्ञ विजय भटकर ही व अशासारखी कितीतरी माणसे आपल्या राष्ट्राची संपतीच आहे. जेंव्हा भारताच्या स्वातंत्र्याला, अस्मितेला समाज विघातक शक्तींकडून आव्हान दिले जाते. तेंव्हा त्यांचा बिमोड करणारे आपले सैन्य आणि त्यातील प्रत्येक सैनिक हा आपला जीव धोक्यात घालून देशाचे संरक्षण करत असतो. ये मेरे वतन के लोगो गाणे म्हणणाऱ्या लता दीदींच्या गाण्यामुळे खुद्द पंडीत नेहरुंना गहिवरुनआले होते.


जब देश मे थी दिवाली वो खेल रहे थे होली.
जब हम बैठे थे घरो में वो झेल रहे थे गोली

या कवि प्रदीपच्या ओळीवरुन गहिवरुन न येणारा भारतीय क्वचितही सापडणार नाही. आणि म्हणूनच भारत हा माझा देश आहे. याचा मला अभिमान वाटतो.
चला तर मग हे स्वातंत्र्य असेच राहावे म्हणून एकमुखाने म्हणू या
आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. . .

शैला दांदळे

Share this Story:

Follow Webdunia marathi