पाकिस्तानमध्ये भडकलेल्या हिंसक घटनांमध्ये तेथील प्रसार माध्यमांनी भारतीय नागरिकांना दोषी ठरविण्यास सुरूवात केल्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपल्या नागरिकांना पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्याने पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तांचे खंडन करताना सांगितले, की पाकिस्तानात होत असलेल्या हिंसक घटनांमध्ये तेथील अशा एजन्सी जबाबदार आहेत, ज्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.