Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमधील शासन व्यवस्था

नितीन फलटणकर

चीनमधील शासन व्यवस्था
चीन म्हटलं की आपल्या डोळ्या पुढ्यात येतात कुंफू कराटे किंवा लाल ड्रॅगन. चीन विषयी खूप थोड्या लोकांना माहिती आहे. येथील शासन पद्धती कशी आहे? चीनमध्ये कोणाचे सरकार आहे? हे आणि असे असंख्य प्रश्न आपल्याला भेडसावत असतात. पण आपण त्याचा शोध घेण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. मागील काही दिवसांपासून चीन आणि भारतादरम्यान शीतयुद्ध सुरू झाले आहे.

चीनने भारतीय हद्दीत प्रवेश करत आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. चीनला संपूर्ण ओळखायचे असेल तर चीनमध्ये डोकावणे गरजेचे आहे.

चीनमध्ये प्रामुख्याने त्रिस्तरीय शासन पद्धती दिसून येते. प्रांत, काऊंटी आणि टाऊनशिप.स्वतंत्र राजकीय प्रांत, त्यांचे विभाग आणि केंद्र शासनाच्या प्रत्यक्षनियंत्रणाखालील महानगरपालिका अशी विभागणी चीनमध्ये शासन व्यवस्थेची करण्यात आली आहे.

या तीनही विभागांचे पुढे उपविभाग पडतात. उदाहरण द्यायचे झालेच तर प्रांतांचे विविध विभाग, काऊंटींचे विभाग आणि स्वतंत्र राज्यांचे उपविभाग पडतात.

चीनमधील महानगरपालिका आणि नगरपालिकांवर केंद्र सरकारचे प्रत्यक्षात नियंत्रण आहे. तर येथील मोठ्या शहरांचे विभाजन जिल्हा आणि पुन्हा काऊंटींमध्ये करण्यात आले आहे. चीनमध्ये सध्य स्थितीत 23 प्रांत, 5 स्वतंत्र राज्य, 4 महानगरपालिका आणि दोन विशेष प्रशासकीय विभाग आहेत.

नाव इंग्रज आणि मराठीत राज्य क्षेत्रफळलोकसंख्या

Share this Story:

Follow Webdunia marathi