Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी महाराजांच्या इष्ट देवामुळे शत्रूची योजना ठरली निष्फळ

webdunia
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)
समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणारे मोगल कुठल्याही थरावर जाणारे असत. त्यांनी शिवाजी महाराजांवर अघोरी विद्येचा आधार घेऊन कट कारस्थान रचून महाराजांची हत्या करण्याचा कट रचला.
 
एक मोगल शिपाई तंत्र-मंत्राच्या जोरावर पहारेकर्‍यांचा डोळा चुकवून शिवाजी महाराजांच्या विश्रांतीच्या खोलीत पोहोचला आणि शिवाजी महाराजांवर तलवार घेऊन वार करणार तोवरच त्याचा हाताला एका अदृश्य शक्तीने रोखले. त्याला वाटले की मी सगळ्यांना दृष्टिक्षेप करून इथवर पोहोचलो मग मला कोणी अडविले. त्याला लगेच उत्तर मिळाले की तुझा इष्ट तुझे रक्षण करून इथवर घेऊन आला तसेच आता महाराजांचे इष्टही त्यांचे रक्षण करत आहे.
 
 
तात्पर्य :- महाराजांच्या इष्ट देवामुळे शत्रूची दुष्ट योजना निष्फळ ठरली आणि महाराजांचे रक्षण झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी हरभराच्या डाळीच्या पिठाने बनलेले हेयर मास्क वापरा