छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापती बद्द्ल जाणून घ्या जे एकटेच हत्तीसोबत लढले
, सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (06:40 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांची सेना पराक्रमी योद्धांनी परिपूर्ण होती. त्यांचे छत्रपती आणि स्वराज्य बद्द्ल समर्पण, निष्ठा, प्रेम अमूल्य होते. ते छत्रपतींच्या एका आदेशवर प्राणांची बाजी लावायचे आणि स्वराज्याच्या शत्रुंवर वाघाप्रमाणे आक्रमण करायचे. त्यातील एक होते येसाजी कंक.
येसाजी कंक हे छत्रपतींच्या सैन्याचे सेनापती होते. त्यांच्या स्वामिनिष्ठेचा अंदाज यावरुन बांधता येईल की, त्यांनी 30 वर्ष स्वराज्य सेनेला दिले. पण कधी 20 दिवसांसाठी आपल्या घरी गेले नाहीत. छत्रपती हे जेव्हा दक्षिण विजयासाठी निघाले तेव्हा येसाजींना महत्वपूर्ण दायित्व दिले गेले होते.
येसाजी कंक यांच्या विरतेबद्द्ल जाणून घेण्याकरिता इतिहासात एक प्रसंग मिळतो. जेव्हा छत्रपती हे हैद्राबादच्या कुतुबशाह जवळ पोहचले तेव्हा कुतुबशाह उपहास करत म्हणाला की, तुमच्या सेनेमध्ये चाळीस हजार घोडे दिसत आहे पण हत्ती मात्र एक ही नाही. तेव्हा महाराज म्हणालेत की आमच्या सेनेचा एक एक मावळा हत्तीच्या बरोबरीने शक्ती ठेवतो आणि हत्तीसोबत लढू शकतो. छत्रपतींचे हे बोलणे ऐकून कुतुबशाह हसायला लागला. छत्रपती म्हणालेत की, तुम्ही कुठलाही सैनिक निवडा आणि लोकांना एकत्रित करा. माझा एक एक सैनिक हत्तीसोबत लढण्याची शक्ती ठेवतो. कुतुबशाहने छत्रपतींच्या जवळ उभे असलेले दुबळे-बारीक, साडेपाच फुटाचे एक सैनिक (येसाजी कंक) यांना निवडले.
कुतुबशाहच्या आदेशनुसार एका हत्तीला उत्तेजित करून सोडले गेले. हत्ती रागाच्या भरात येसाजींवर तुटून पडला. येसाजी यांनी चपळता दाखवली आणि उडी घेऊन हत्तीच्या मागे गेले व त्याची शेपूट पकडली. हत्ती यामुळे जास्त उत्तेजित झाला आणि आक्रमण करण्यासाठी फिरू लागला. पण येसाजींची पकड एवढी मजबूत होती की, हत्ती आपली शेपूट सोडवू शकला नाही. शेवटी तो थकून गेला व रागात येऊन सोंड हवेत उडवून आपटू लागला. हत्तीने जेव्हा सोंड हवेत फिरवली तेव्हा संधी पाहून येसाजींनी तलवारीने हत्तीची सोंड कापली. यामुळे हत्ती जमिनीवर कोसळला. हा पराक्रम दाखवून येसाजींनी छत्रपतींना प्रणाम केला आणि त्यांच्या मागे येऊन उभे राहिले.
हे पाहून कुतुबशाह आश्चर्यचकित झाला. त्याने मोतींची माळ, पाच हजार मुद्रा आणि दहा वर्षापर्यंत अनुदान हे बक्षीस देण्यास सांगितले. यावर येसाजी म्हणाले की, आमचे शिवाजीराजे आम्हाला सर्वकाही देण्यासाठी सक्षम आहेत. महाराजांच्या आदेश मानून मी हा पराक्रम केला आणि मी हे बक्षीस महाराजांच्या चरणात अर्पण करीत आहे. मी फक्त स्वराज्य आणि महाराजांचा सेवक आहे. माझ्यावर पहिला अधिकार त्यांचा आहे.
हे ऐकून कुतुबशाह आश्चर्यचकित झाला. त्याने छत्रपतींसमोर प्रस्ताव ठेवला की, एवढा स्वामीनिष्ठ, पराक्रमी, स्वराजनिष्ठ व्यक्ती मला देऊन दया. बदल्यात तुम्हाला एक हजार हत्ती दिले जातील. पण छत्रपती नकार देत म्हणालेत की, आमच्या प्रत्येक सैनिकाचे हे गुण त्यांना महान बनवतात आणि आमचा कोणताही वीर सैनिक स्वराज्याला सोडून जाऊ शकत नाही. आमचा प्रत्येक सैनिक पूर्ण स्वराज्याचे प्रतिनिधित्व करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या सैनिकांप्रती प्रेम आणि सैनिकांचे स्वराज्य आणि छत्रपतींप्रती श्रद्धा, निष्ठा, प्रेम आणि भक्ती पाहून कुतुबशाह आश्चर्यचकित झाला.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख