Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आझादी ट्रेनवर दहशतवादी बुरहान वानीचा फोटो

आझादी ट्रेनवर दहशतवादी बुरहान वानीचा फोटो
इस्लामाबाद- हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानीला श्रध्दांजली वाहण्यासाठी काळा दिवस पाळणाऱ्या पाकिस्तानने आता करंटेपणाचा कळस गाठला आहे. पाकने आपल्या विशेष आझादी ट्रेनवर बुरहान वानीचे आणि काश्मीरमधील पीडितांचे फोटो लावून भारतला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
 
पाकिस्तानच्या मनातील भारतद्वेष आजवर अनेकदा स्पष्टपणे समोर आला आहे. दहशतवादाच्या मुद्यावर तर तो जगापुढे उघडा पडला, पण त्यांचे वाकडे शेपूट काही केल्या सरळ होत नसून, काश्मीरवर कब्जा करण्यासाठी त्यांनी भारताशी छुपे युद्धच पुकारले आहे। जनतेला भडकवण्यासाठी ते रोज नवनवे डाव टाकत आहेत. भारतीय लष्कराने ठार केलेल्या दहशतवादी बुरहान वानीला त्यांनी ‘शहीद’ ठरवले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याचे फोटो लावून भारताविरोधात वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
 
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी दरवर्षी विशेष आझादी ट्रेन चालवली जाते. देशभरात जाऊन ती पाकच्या संस्कृती- परंपरेचे दर्शन घडवते. ती यंदा बुरहान वानीच्या फोटोंनी भरून गेली आहे. तसेच त्रस्त काश्मिरींचे फोटो त्यावर लावण्यात आले आहेत. भारतीय लष्कर काश्मिरी जनतेचा कशाप्रकारे छळ करते, हे फोटोतून दाखविण्यात आले आहे. सैयद अली गिलानी यांनी या ट्रेनचा फोटो आवर्जून ट्विट केला आहे. याआधी गिलानींनी बुरहानला गौरविण्यात यावे, अशी मागणी केली होती.
 
आझादी ट्रेन ११ ऑगस्टला इस्लामाबादमधील मार्गिला रेल्वे स्टेशनहून सुटणार आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री ख्वाजा साद रफिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ट्रेनवरील बुरहानच्या फोटोबद्दल आता भारत सरकार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेप तो चलतेही रहेते है: रेणुका चौधरी