Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून अमेरिकन पत्रकाराचा निर्घृण हत्या

आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून अमेरिकन पत्रकाराचा निर्घृण हत्या
वॉशिंग्टन , बुधवार, 20 ऑगस्ट 2014 (17:10 IST)
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी एका अमेरिकन पत्रकाराचा गळा कापून त्याची निर्घृण हत्या केली आहे. याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर जारी करण्यात आला आहे. त्यात जेम्स फोले या पत्रकारांची निर्घृण हत्या केल्याचे दाखवण्यात आले आहे.
 
जेम्स फोले हा फ्रीलान्स पत्रकार होता. तो 2012 पासून बेपत्ता आहे. इराकवरील हवाई हल्ले न थांबवल्यास आणखी दुसर्‍या पत्रकाराची हत्या केली जाईल, अशी धमकीही  अमेरिकेला धमकीही दिली आहे. अमेरिकेने इराकवरील हवाई हल्ले बंद केली नाही तर त्याच्या ताब्यात असलेल्या आणखी एका अमेरिकन पत्रकाराची हत्या केली जाईल, अशी धमकीही दिली आहे. 
 
आयएसआयएसने जारी केलेला व्हिडिओ चार मिनिटांचा आहे. यूट्यूब आणि अल फुर्कान मीडियावर पोस्ट करण्‍यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi