Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयएसआयएस प्रमुख अल बगदादी ठार झाला...

आयएसआयएस प्रमुख अल बगदादी ठार झाला...
रक्का , मंगळवार, 14 जून 2016 (14:52 IST)
जग भरात क्रूर दहशतवादी म्हणून ओळख निर्माण करणारा आयएसआयएसची नीव ठेवणारा अबू-बकर-अल-बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. ईरानी मीडियाचे म्हणणे आहे की आयएसआयएसच्या विरुद्ध अमेरिकेच्या नेतृत्वात चालवण्यात आलेल्या हवाई अभियानात बगदादी ठार झाला आहे.  
 
अमेरिका किंवा अन्य कुठल्याही देशाने या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. इराण आणि तुर्कीश वर्तमानपत्र येनिस सफाकने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. इसिसचा खलिफा बगदादी रविवारी झालेल्या हल्ल्यात ठार झाला असे अल अमाक्यू वृत्तसंस्थेने प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 
 
रमजानच्या पाचव्या दिवशी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात बगदादी ठार झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मंदिरात पती-पत्नी सोबत नाही करू शकत पूजा