Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयफोन6 पेक्षाही लांब आहे बाप-बेटीची जीभ

आयफोन6 पेक्षाही लांब आहे बाप-बेटीची जीभ
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (13:07 IST)
सामान्य व्यक्ती एखादे काहीतरी वेगळे काम करते, तेव्हा ती सामान्य राहत नाही. कारण त्यावेळी ती जगातील अनोखे काम करणारी व्यक्ती बनते. न्यूयॉर्कच्या सायराक्युज शहरात राहणारा बायरन स्लेंकर नामक व्यक्ती असाच असामान्य ठरला आहे. बायरनचे वय ४७ वर्षे आहे. मात्र जेवढे त्याचे वय आहे, तेवढीच त्याची जीभही मोठी आहे. या माणसाची जीभ तब्बल ३.३७ इंच लांब व दोन इंच रुंद आहे. गिनीज बुकात जगातील सर्वात लांब जिभेचा विक्रम ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्याचीही जीभ तीन इंच लांब सांगितली जाते. पण ३.३७ इंच लांब जिभेसह त्याचा विक्रम मोडीत काढून बायरन सर्वात लांब जिभेचा ठरला आहे. विशेष म्हणजे बायरनच नाही तर त्याच्या मुलीचीही जीभ भलीमोठी आहे. आपल्या लांब जिभेमुळे बायरनने नोव्हेंबरमध्ये जॉ ड्रॉपपिंग नावाची स्पर्धा जिंकली होती. आपल्या मुलीला एका प्रोजेक्टमध्ये मदत करत असताना बायरनला आपल्या लांब जिभेबाबत समजले. मुलीला त्याची जीभ जरा जास्तच लांब वाटली, तिने तत्काळ तिचे मोजमाप घेतले. ती गिनीज विक्रमात नोंद असलेल्या जिभेपेक्षाही लांब भरली . त्यानंतर लगेच गिनीज बुकच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून आपल्या पित्याच्या लांब जिभेची माहिती दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi