Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्तंबुल विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले

इस्तंबुल विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले
इस्तंबुल , बुधवार, 29 जून 2016 (10:36 IST)
दहशतवाद्यांनी इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले केले. एके 47 घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर सुरुवातीला गोळीबार केला. त्यानंतर तीन आत्मघाती स्फोट घडवून आणले.

हा हल्ला दहशतवादी संघटना आयसिसनं केल्याची शक्यता तुर्की सरकारनं वर्तवली आहे. तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झालेत. मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोमूत्रात आढळले सोने