Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्लामाबादमध्ये बनणार पहिले हिंदू मंदिर

इस्लामाबादमध्ये बनणार पहिले हिंदू मंदिर
इस्लामाबाद- पाक संसदेच्या एका समितीने देशाच्या राजधानीत हिंदुंचे कोणेतेही पुजास्थळ नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. नॅशनल असेंबलीच्या धार्मिक विषयक स्थायी समितीने सरकारला इस्लामाबादमध्ये हिंदुंसाठी एक मंदिर बनविण्याचा निर्देश दिला.
 
समितीच्या बैठकीचे अध्यक्षत्व रमेश लाल यांनी केले. मंदिरासोबत एक स्मशानभूमी बनविण्याचा देखील निर्देश देण्यात आला. हिंदू समुदायाच्या पूजा-अर्चनेसाठी इस्लामाबादमध्ये एक देखील मंदिर नसल्याची बाब दुःखद असल्याचे लाल यांनी म्हटले.
 
इस्लामाबादमध्ये कमीतकमी 500 हिंदू राहतात. परिवारात कोणाचाही मृत्यू झाल्यावर त्यांना अंतिम संस्कारासाठी रावळपिंडीला जावे लागते. देशात अल्पसंख्यांकासोबत सरकार ही कसले वर्तन करत आहे. हिंदुंना प्रार्थनेसाठी त्यांच्या शहरात एक मंदिर असावे हा त्यांचा मूळ अधिकार असल्याचे समितीने म्हटले. हिंदू मंदिर बनविल्याने सुरक्षा व्यवस्था बिघडू शकते असा दावा समितीने फेटाळला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लघुशंकेसाठी गेला आणि जीव घालवून बसला