Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऍमेझॉनचे सीईओ विष्णू अवतारात

ऍमेझॉनचे सीईओ विष्णू अवतारात
, बुधवार, 13 जानेवारी 2016 (11:26 IST)
वॉशिंग्टन- फॉच्र्युनच्या कव्हर पेजवर ऍमेझॉन सीईओ जेफ बेझोस यांना विष्णू अवतारात प्रस्तुत केल्याने वाद पेटला आहे. या घटनेमुळे विश्वभरातील हिंदू नाराज झाले आहेत.


 
फॉच्र्युनने जानेवारी महिन्यातील आपल्या अंकात मॅगझिनच्या कव्हर पेजवर ऍमेझॉन सीईओ जेफ बेझोस यांना विष्णू अवतारात प्रस्तुत केले. जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर पसरलं तर गोंधळ उडाला या पत्रिकेविरुद्ध हिंदू लोकांनी नाराजगी व्यक्त केली.
 
अमेरिकेत राहणारे हिंदू लोकांनी यावर विरोध दर्शवत म्हटले की यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. तरी, या प्रकरणानंतर पत्रिकेच्या संपादकाने माफी मागून चूक मान्य केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi