Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कारच्या नंबरसाठी मोजले साडेपाच कोटी!

कारच्या नंबरसाठी मोजले साडेपाच कोटी!
मनाजोगी कार विकत घेण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करणार्‍यांची संख्या कमी नाही, आणि आवडा नंबर मिळावा यासाठी कारच्या किंमतींपेक्षाही अधिक रक्कम द्यावी लागली तरी शौकीन तयार असतात.

दुबईत असाच एक नंबर मिळावा यासाठी एका व्यापार्‍याने चक्क साडेपाच कोटी रुपये खर्च केले.आणि त्यामुळे दुबई परिवहन विभागाला एकाच दिवसात कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.

नंबरच्या लिलावातून दुबई परिवहन विभागाला 35 कोटी रुपये मिळाले असून, जी- 16 या नंबरसाठी विभागाला साडेपाच कोटी मिळाले आहेत. इतका महाग नंबर विकत घेणार्‍या त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास मात्र परिवहन विभागाने नकार दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi