Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमधील 3500 फुटांवरच्या संपूर्ण काचेच्या ब्रिजला तडा

चीनमधील 3500 फुटांवरच्या संपूर्ण काचेच्या ब्रिजला तडा
, शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2015 (11:38 IST)
समुद्रसपाटीपासून साधारणपणे 3 हजार 500 फूट उंचीवर बांधण्यात आलेल्या चीनमधल्या संपूर्ण काचेच्या पुलाला तडा गेला आहे. पर्यटकाचा स्टीलचा मग काचेवर पडून चीर गेल्याने काही काळ धावपळ आणि घबराटीचं वातावरण पसरलं होतं. मात्र कोणालाही दुखापत झाली नसून यानंतर तातडीने ब्रिज दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला. ब्रिजच्या एका टोकाला असलेल्या काचेला तडा गेला. आवाज ऐकून तिथे असलेल्या पर्यटकांची भंबेरी उडाली आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी एकच गलका केला, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

मात्र ही बाब तितकीशी गंभीर नव्हती, पर्यटकांनी उगाच धावपळ केली, असं ब्रिजच्या सिक्युरिटी टीमने म्हटलं आहे. हा फक्त एक तडा नव्हता, अख्खा ब्रिजच हलल्यासारखं मला जाणवलं. त्यामुळे आम्ही राईचा पर्वत करत असल्याचा हुंताई माऊण्टन टीमचा दावा चुकीचा आहे असं एका पर्यटकाने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं आहे. 
 
काहीच दिवसांपूर्वी चीनमधल्या हुंताई पर्वतरांगाजवळ बांधलेल्या या ग्लास बॉटम ब्रिजचं उद्घाटन झालं होतं. काचेमुळे पर्यटकांना भीती आणि थरार यांचा एकत्रित अनुभव घेण्याची संधी मिळते. डबल फेन्सिंग आणि ट्रिपल लेयरच्या काचेमुळे हा ब्रिज सुरक्षित असल्याचा दावा केला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi