Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनमध्ये बारा मजली इमारतीला आग

चीनमध्ये बारा मजली इमारतीला आग

भाषा

बिजिंग , गुरूवार, 3 जानेवारी 2008 (13:29 IST)
चीनमधील उरूमकी शहरात काल रात्री एका बारा मजली इमारतीला भीषण आग लागली. यावेळी शेजारीच असलेल्या वीस मजली हॉटेललाही आग लागल्याचे वृत्त आहे. या भीषण अग्निकांडात कोणत्याही प्रकारच‍ी प्राणहानी झाली नाही.

सरकारी वृत्तानसार, काल रात्री उशिरा देहुई इंटरनॅशनल प्लाझा या इमारतीला आग लागली. या आगीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पंधरा तास प्रयत्न करावे लागले. आगीमुळे इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून ती केव्हाही कोसळू शकते.

या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत कपडे, सौंदर्यप्रसाधने, खेळणी व विविध उत्पादनाची दुकाने आहेत. तर पाच ते बारा मजल्यापर्यंत अनेक कार्यालये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi