Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीन पाडणार मराठवाड्यात पाऊस

चीन पाडणार मराठवाड्यात पाऊस
बिजींग , सोमवार, 20 जून 2016 (10:51 IST)
महाराष्ट्रात ‘क्लाऊड सीडिंग’ तंत्रज्ञानाद्वारे पाऊस पाडण्यासाठी चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणं, तसंच कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे.

नुकतंच चीनमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांच्या एका पथकाने महाराष्ट्र दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांमध्ये कृत्रिम पावसाबाबत चर्चा झाली. जर महाराष्ट्राने होकार दिला, तर 2017 मध्ये मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. कृत्रिम पावसाबाबत सध्या चीन आणि भारत सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. जर ही चर्चा सकारात्मक झाली, तर चीनी तज्ज्ञ भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांना आधुनिक क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देईल. ही चर्चा यशस्वी झाल्यास, मराठवाड्यात 2017 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊ, असं चीनने म्हटलं आहे.

चीनमध्ये क्लाऊड सीडिंग रॉकेट्सच्या आधारे कृत्रिम पाऊस पाडला जातो. पाऊस पाडण्यासाठी ढगांची गरज असते. या ढगांवर मारा केल्यानंतर कृत्रिम पाऊस पडतो. चीन 1958 पासून क्लाऊड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञानापैकी एक असं हे तंत्रज्ञान चीनकडे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोल्हापुरात युवतीची आत्महत्या