Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा ओबामांना लागली रस्त्यात भूक

जेव्हा ओबामांना लागली रस्त्यात भूक
ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत. हनोईमध्ये ओबामांनी अँथनी बौर्डन यांना सोबत घेतलं आणि हनोईच्या रस्त्यावर फिरण्यासाठी निघाले. अचानक त्यांच्या गाडय़ांचा ताफा एका गल्लीतील छोटय़ाश्या हॉटेलजवळ थांबला आणि गाडीतून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उतरले.

ओबामांसोबत असलेले स्पेशल सर्विसेस एजेंटस् आणि सुरक्षारक्षकांनादेखील काही कळत नव्हतं. ओबामा अचानक त्या साध्या हॉटेलमध्ये गेले आणि तेथे जेवन ऑर्डर केलं. सुरक्षारक्षकांनी तेवढय़ा वेळेपुरता रस्ता दोन्ही बाजूंनी आपल्या ताब्यात घेतला. पण ओबामांना याची कोणतीही कल्पना नव्हती ते तर हॉटेलमध्ये मस्त सूपचा आस्वाद घेत होते. डिनर केल्यानंतर त्यांनी झालेलं 6 डॉलरचं बिलही दिलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंग्लंडच्या पंतप्रधानांनी बायकोसाठी सेकंडहॅण्ड कार घेतली