Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादाविरूद्ध लढ्याचा निर्णय योग्यच: मुशर्रफ

दहशतवादाविरूद्ध लढ्याचा निर्णय योग्यच: मुशर्रफ

एएनआय

लाहोर , बुधवार, 15 ऑक्टोबर 2008 (16:57 IST)
पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दहशतवादाविरूद्ध लढ्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण योग्यच होते, असे सांगून भविष्यातही ते कायम ठेवण्याची सूचना केली आहे.

दहशतवादाविरूद्ध लढ्याच्या निर्णयाचे समर्थन करताना याबाबत पूर्ण शहानिशा केल्यानंतरच निर्णय घेण्यात आला होता, असे त्यांनी डेली टाईम्सला सांगितले.

दहशतवाद निपटून काढल्याशिवाय राष्ट्रीय सुरक्षिततेची हमी देता येणार नाही, असेही ते म्हणाले. नुकतेच निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी सन्मानार्थ आयोजित रात्रीभोजास ते उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल अष्फाक कयानीही यावेळी उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi