Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकमधील हिंदूंच्या मंदिराचे संरक्षण करणार: हाफीज सईद

पाकमधील हिंदूंच्या मंदिराचे संरक्षण करणार: हाफीज सईद
इस्लामाबाद- पाकिस्तानमधल्या हिंदूच्या मंदिरांचा विध्वंस होऊ देणार असे वक्तव्य जमात उल दावा या संघटनेचा प्रमुख हाफीज सईदने केले आहे. मुंबईवरच्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यासाठी सईदला मुख्य आरोपी म्हणून भारताने घोषित केले असताना आणि पाकिस्तानचे त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असताना सईदचं हे वक्तव्य अनेकांसाठी धक्कादायक आहे.
 
सिंध प्रांतातल्या एका सभेत बोलताना सईदने हिंदू बांधवांच्या प्रार्थनास्थळांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याचे म्हटले आहे. अन्य धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांना आम्ही तोडू देणार नाही, असे सांगणार्‍या सईदने भारताच्या आरोपांचे खंडन केले आहे. मदरशांच्या माध्यमातून कट्टर पंथीयांना सईद प्रोत्साहन देत असल्याचा आरोप असून आपण असे काही करत नसल्याचा दावा त्याने केला आहे.
 
भारताविरोधात सतत गरळ ओकणार्‍या सईदने यावेळी वेगळाच सूर आळवत हिंदू धर्मीयांची मंदिरे पाडण्याला विरोध दर्शविला आहे. पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पुरातन हिंदू मंदिरे पाडण्यात आली आहे. आता सईदने या विरोधात आपली संघटना उभी राहणार असल्याचे म्हटले आहे. सईद म्हणाला की, हिंदू धर्मीयांच्या प्रार्थना स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मुस्लिमांची आहे. पाकिस्तानमध्ये आमची संघटना हिंदू व इतर धर्मीयांची प्रार्थना स्थळे पडू देणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘नीट’ सुनावणी गुरुवारी; टांगती तलवार काम