Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकमध्ये शिखांना सण साजरा करण्यास मनाई!

पाकमध्ये शिखांना सण साजरा करण्यास मनाई!

वेबदुनिया

इस्लामाबाद , मंगळवार, 19 जुलै 2011 (14:20 IST)
मुस्लिमांचा पवित्र दिवस 'शबे बारात' हा अतिमहत्त्वाचा असल्याचे कारण सांगून गुरुद्वारांमध्ये शिखांना सण साजरा करण्यास लाहोरमध्ये मनाई करण्यात आली आहे. ठदावत-ए-इस्लामीठ या गटाने कार्याक्रमस्थळी जाऊन तेथील सामान फेकून दिल्याचे स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. उद्या ( मंगळवारी) होणार्‍या ठशबे बारातठनंतरच शिखांना कार्यक्रम घेण्यास सांगण्यात आले असून, त्यांना गुरुद्वारा परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

गुरुद्वाराच्या ठिकाणी आधी एका मुस्लीम संताची कबर असल्याचा दावा दावत-ए-इस्लामी गटाने चार वर्षांपूर्वी केला होता. यावर शिखांनी तक्रार केली असता, दोन्ही धर्मीयांना तेथे धार्मिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली होती


Share this Story:

Follow Webdunia marathi