Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानमध्ये 18 दहशतवादी ठार

पाकिस्तानमध्ये 18 दहशतवादी ठार

वेबदुनिया

इस्लामाबाद , बुधवार, 21 सप्टेंबर 2011 (12:50 IST)
पाकिस्तानातील वायव्येकडील ओरकाझाई प्रांतातील सुरक्षा चौकीवर तालिबानी दहशतवादी आणि लष्करामध्ये आज झालेल्या चकमकीत 18 दहशतवादी व एक सैनिक ठार झाला.

पीटीव्ही सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ओरकाझाई या आदिवासी प्रांतातील सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी रॉकेट आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला केला. यात एक सैनिक ठार झाला, तर पाच जखमी झाले. या हल्ल्याला लष्कराने प्रत्युत्तर दिले. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने लष्कराने दहशतवाद्यांचा शोध घेतला. डोंगराळ भागातील दहशतवाद्यांचे चार अड्डे उद्‌ध्वस्त करण्यात आले. या धुमश्‍चक्रीत सोळा दहशतवादी जखमी झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi