Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाक ‍रसिकांच्या प्रेमाने नसिरुद्दीन शाह भारावले

पाक ‍रसिकांच्या प्रेमाने नसिरुद्दीन शाह भारावले

वेबदुनिया

IFM
प्रसिद्ध उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांचा लघुकथेवर आ‍धारित 'घरवाली'या नाट्यकृतीमधील भूमिकेबद्दल ज्येष्ठ भारतीय सिने नाट्यकलावंत नसिरुद्दीन शहा यांना पाकिस्तानातील रसिकांनी 'स्टँडिंग ओव्हेशन' दिले. त्यावर हा परफॉर्मन्स अभिनय कारकिर्दीत सर्वात संस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया शाह यांनी दिली आहे. शनिवारी रात्री 'घरवाली' हे नाटक सादर करण्यात आले. प्रयोग सादर झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शाह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक वर्षांपासून नाटक आणि सिनेमातून काम करीत आहे, परंतु लाहोरमध्ये जसे प्रेम मिळाले, तसे आयुष्यात मला कधीही मिळाले नाही. जगात असा अनुभव मला कधी मिळाला नव्हता, असे शाह म्हणाले. या नाटकात शाह यांच्यासोबत पत्नी रत्ना पाठक शाह आणि मुलगी हिबा शाह यांच्याही भूमिका होत्या. याशिवाय फैज अहमद फैज यांचीही भूमिका होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi