Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुढील 35 वर्षात बदलणार मानवाचा चेहरामोहरा

पुढील 35 वर्षात बदलणार मानवाचा चेहरामोहरा
, मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (15:32 IST)
लाल डोळे, मोठे डोके, सरासरी 120 वर्षाचे आयुष्य आणि मोठ्या वयातही मुले जन्माला घालण्याची क्षमता ही वर्णने कोण्या परग्रहावरील माणसाची नाहीत तर पृथ्वीवरील माणसाचीच आहेत. वाचायला विचित्र वाटले तरी ग्लोबल ब्रेन इन्स्टिट्युटमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार आणखी 35 वर्षात म्हणजे 2050 पर्यंत माणसाचा चेहरामोहरा असा बनलेला असेल.

संशोधक कॉडेल लॉस्ट यांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन तंत्रज्ञान, पर्यावरण व जीवनशैलीत वेगाने होत असलेले बदल यामुळे मानवाच्या विकासाचा नवा संक्रमण काळ सुरू झाला आहे. पुढील 35 वर्षात माणसाचे शरीर पूर्णपणे बदलेल. वानराचा मानव बनताना जशी उत्क्रांती झाली तसेच हे संक्रमण असेल. अनेक कामे रोबोटवर सोपविली जातील आणि मुले जन्मास घालण्याचे वयही अधिक असेल परिणामी माणसाजवळ मोकळा वेळ खूप राहणार. हा वेळ
माणसे सामाजिक कार्यात सहभागी होण्यात घालवतील. लोक आभासी दुनियेच्या अधिक जवळ जातील. आताही जीवनाचा वेग अधिक आहे पण त्यामुळे माणसे लवकर म्हातारी होत आहेत. येत्या चार दशकात हा जीवनवेग हळूहळू कमी होत जाईल आणि माणसे दीर्घकाळ आयुष्याचा उपभोग घेतील. त्याच्या डोक्याचा आकार वाढेल तसेच डोळ्याचा रंगही बदलेल. अगदी 60 व्या वर्षातही मुले जन्माला घालण्याची शक्ती त्यांच्यात राहील असे त्यांचे म्हणणे आहे.
    


Share this Story:

Follow Webdunia marathi