Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुश म्हणतात, 'होय मी दारुडा होतो '

बुश म्हणतात, 'होय मी दारुडा होतो '

भाषा

वॉशिंग्टन , गुरूवार, 31 जानेवारी 2008 (18:48 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या जुन्या रूपा विषयी ऐकून आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल, पण त्यांनी स्वतः याविषयी कबुली दिल्याने या गोष्टीवर विश्वास ठेवणे आपल्याला भाग आहे.


गेल्यावर्षी एबीसीला बुश यांनी दिलेल्या एका मुलाखतीत कबूल केले आहे की कधीकाळी ते तरुण असताना त्यांना दारूचे व्यसन जडले होते.
ते दारूच्या इतक्या अधीन गेले होते की, आपली दारू पिण्याची सवय आता काही केल्या सुटणार नाही अशी भितीही त्यांना वाटत होती.

वयाच्या 40 वर्षांपर्यंत त्यांना या सवयीने पुरते सतावले होते. काही केल्या त्यांची ही सवय मोडत नव्हती. 1976 मध्ये त्यांना दारूपीऊन गाडी चालवल्या प्रकरणी दंडही झाला होता.

पण बाल्टीमोरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते गेले असताना, तेथील वातावरणाने ते भारावून गेले आणि त्यांना दारू सोडण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi