इस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. पाकिस्तान सोशल मीडियावर महादेवाच्या रूपात इमरान खानाचा फोटो व्हायरल होत आहे. यामुळे गोंगाट पसरला आहे. पाकमध्ये राहणारे हिंदूच नव्हे तर पाक संसदेतही हल्ला होत आहे.
सूत्रांप्रमाणे पाकिस्तानी संसदने तहरीक-ए-इंसाफ चे अध्यक्ष इमरान खानला महादेवाच्या रूपात दर्शवण्याबद्दलची चौकशी संघीय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ला सोपवली आहे. यापूर्वी संसदेत पीपीपी सदस्याने आरोप लावले होते की हे काम नवाज शरीफचे पक्ष मुस्लिम लीग याचे आहे.
शरीफ यांच्या पक्षाला समर्थन देणार्या फेसबुक पेजवर ही फोटो शेअर केली गेली आहे. 8 एप्रिल रोजी फोटो पोस्ट करण्यात आली आहे. या प्रकरणावर पाक येथील हिंदू लोकांनी विरोध नोंदवला आहे.
फोटो चर्चेत आल्यानंतर संसदेत सदनाची कार्यवाही दरम्यान पाकिस्तान पीपुल्स पार्टी चे सदस्य रमेश लाल यांनी या कृत्यासाठी नवाज शरीफ यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवाबदार ठरवले. त्यांनी सत्ताधारी पक्षावर अल्पसंख्यक हिंदूंची भावना दुखवण्याचा आरोप लावला.