Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिनाभरात कसाबचा बदला घेऊ!

महिनाभरात कसाबचा बदला घेऊ!

वेबदुनिया

WD
पाकिस्तान तालिबान संघटनेतील एका गटाने मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात फासावर लटकविण्यात आलेल्या अजमल कसाबचा बदला एका महिन्यात घेण्याची धमकी दिली आहे. सूड उगविण्याकरिता हल्ले करण्यासाठी अमृतसर आणि हैदराबादेत दहशतवादी घुसले असल्याचा दावाही या गटाने केला आहे.

अजमल कसाबच्या मृत्यूचा बदला आम्ही महिनाभरात भारतीय भूमीवरच घेऊ, अशी धमकी तहरिक-ए-तालिबानच्या जुंदुल्ला गटाचा प्रवक्ता अहमद मारवत याने एका अज्ञात ठिकाणावरून दूरध्वनीद्वारे बुधवारी दिली. कसाबचे हौतात्म्य वाया जाणार नाही. आमचे अनेक लढक्ये अमृतसर आणि हैदराबादमद्‍ये दडून बसले आहेत. ते लवकरच कसाबच्या मृत्यूच्या बदला घेतील.एक कसाब शहीद झाला असला तरी, त्याच्यासाठी अनेक सदस्य हौतात्म्य पत्करण्यास तयार आहेत, असे अहमदने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi