Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुशर्रफ यांना गिलानींचा इशारा

मुशर्रफ यांना गिलानींचा इशारा

वार्ता

मुशर्रफ यांनी आता राजकारणाच्या फंदात न पडता इतरत्र लक्ष घालावे असा सल्ला पाकचे पंतप्रधान युसुफ राजा गिलानी यांनी मुशर्रफ यांना दिला आहे.

मुशर्रफ यांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही गिलानी यांनी दिला आहे. गिलानी सध्या तुर्की दौऱ्यावर आहेत.

पाकमधील जनतेला राजकीय बदल हवे असून, मुशर्रफ यांनी पुन्हा राजकारणाची वाट धरू नये असे आवाहन गिलानी यांना मुशर्रफ यांना केले आहे.

सिमावर्ती भागात वाढत्या दहशतवादावर त्यांनी चिंता व्यक्त केली असून, अमेरिकी सैन्याशिवायही या दहशतवाद्यांचा नायनाट करणे शक्य असल्याचे गिलानी म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi