Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे किस करा आणि 15 वर्ष खूश राहा....

येथे किस करा आणि 15 वर्ष खूश राहा....
मेक्सिको येथे एक जागा असी आहे जिथे प्रेमी किस करण्यासाठी रांगेत उभे राहतात. ही जागा सेंट्रल मेक्सिकोतील गुआनाजुआतो मध्ये आहे. येथे लोक तासोतास रांगेत उभे राहून किस करण्यासाठी वाट बघत असतात कारण असे मानले आहे की येथे किस केल्याने कपल पुढील 15 वर्षापर्यंत सुखी राहतात.


 
येथे फेब्रुवारीत सर्वात जास्त प्रेमी दिसून येतात. या जागेचे नाव एल कैलेजन डेल बेसो अर्थात किस गल्ली. खरं तर या किस गल्लीची कहाणी फार रोचक आहे. 
 
पुढे वाचा...

येथे दोन प्रेमी बाल्कनीत बसून किस करायचे. मुलगी डोना कार्मेन संपन्न घरातील होती तर मुलगा लुईस गरीब कुटुंबाचा होता. डोनाला प्रेम करण्याची परवानगी नव्हती म्हणून लुईसने तिच्या बाल्कनीसमोर एक खोली भाड्याने घेतली.

webdunia

 
जोपर्यंत दोघांच्या कुटुंबाला याबाबत माहीत नव्हतं तोपर्यंत दोघे रात्री उशीरापर्यंत या गल्लीत एकमेकाला किस करायचे. पण जेव्हा मुलीच्या वडिलांना माहीत पडले त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. काही लोकांचे म्हणणे आहे की तिला वाचवण्यासाठी लुईसने बाल्कनीतून उडी मारली आणि खाली पडल्यामुळे त्यांची मान मुरगळली. ज्या खोलीत डोना राहायची तिथे आता एक गिफ्ट शॉप आहे. प्रेमी त्या गल्लीत येतात आणि आपले नाव आणि संदेश सोडून जातात. आणि प्रेम स्थायी राहावं म्हणून येथील खिडकीवर कुलूपही लावतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi