Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रस्त्यावर मेकअप करण्यात ब्रिटिश महिला आघाडीवर

रस्त्यावर मेकअप करण्यात ब्रिटिश महिला आघाडीवर

वेबदुनिया

लंडन , सोमवार, 5 मार्च 2012 (14:20 IST)
PR
मेकअप करण्याची हौस नाही अशा पोरी सापडणे अशक्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. काहीजणींना तर मेकअपसाठी तास दीडतास तरी सहज लागतो. पण आता यावरही करिअरिस्टिक तरुणी, महिलांना चांगला मार्ग काढलाय, घरातून तस्सेच बाहेर पडायचे आणि ऑफिसला जाताना लोकल किंवा बसमध्ये आरामात बसून चेहरा रंगवायला घ्यायचा, असा दिनक्रमच अनेकींनी ठावून टाकलाय.

दिवसेंदिवस या उपक्रमात वाढच होत चाललीय, असाही निष्कर्ष काढण्यात आलाय. 10 पैकी सात महिला सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत असताना मेकअप करतात, असे स्पष्ट झाले आहे. 'डेली एक्सप्रेस' या वर्तमानपत्रात याबाबतचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात असेही समोर आले आहे की ज्या महिला घरातूनच मेकअप करून बाहेर पडतात त्यातील 90 टक्के महिला लोकल किंवा बसमध्ये पुन्हा एकदा त्यावर हात फिरवतात. अशा प्रकारे चालत्या वाहनाता आयलायनर लावष सर्वात अवघड मानले जाते. पण 33 टक्के महिला दररोज अगदी बिनचूक चालत्या वाहनातच आयलायनर लवतात. सर्वात जास्त वापर लि‍पस्टिकचा केला जातो, असाही निष्कर्ष 'डेली एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi