Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडनमध्ये कामुकता रोखण्यासाठी स्कर्टवर बंदी

लंडनमध्ये कामुकता रोखण्यासाठी स्कर्टवर बंदी

वेबदुनिया

लंडन , सोमवार, 18 जून 2012 (13:03 IST)
PR
ब्रिटनच्या एका शाळेने मुलींना स्कर्ट वापरण्यावर बंदी घातली आहे, तसेच घट्ट पॅन्टऐवजी थोडी ढगळ पॅन्ट वापरण्याची सूचना या शाळेने विद्यार्थिनींना केली आहे.

नॉर्थम्पटनशायर शहरातील मॉल्टन स्कूल अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज स्पटेंबरपासून या सूचना अमलात आणण्याचे ठरवले आहे. मुला-मुलींमधील वाढत्या कामुकतेला रोखण्यासाठी हे कठीण पाऊल उचलल्याचे, मुख्याध्यापक ट्रेव्हर जोन्स यांनी म्हटले आहे. विद्यार्थिनींवर या सूनचा बंधनकारक असतील. या सूचनांचे उल्लंघन करणार्‍या विद्यार्थिनींना शाळेत जुने कपडे वापरायला दिले जातील किंवा त्यांना घरी पाठविले जाईल. नाईटक्लबमध्ये घालण्यासारखे स्कर्टस् घालून विद्यार्थिंनी शाळेत येतात. नियमानुसार शाळेत विद्यार्थिनींनी गुडघ्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोडे लांब स्कर्ट वापरायला हवेत, पण असे होताना दिसत नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे जोन्स यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi