Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडनला निघाली ऑलिम्पिक मशाल

लंडनला निघाली ऑलिम्पिक मशाल

वेबदुनिया

लंडन , शुक्रवार, 11 मे 2012 (13:04 IST)
WD
लंडन ऑलिम्पिकच्या ज्योतीचे ग्रीसच्या प्राचीन ऑलिम्पिया येथे प्रज्वलन करण्यात आले आणि त्याबरोबर ऑलिम्पिकचा पारंपरिक पद्धतीने औपचारिक प्रारंभही झाला. प्रज्वलित केलेली ज्योत रिलेतून ग्रीसमध्ये फिरविण्यात आल्यानंतर १८ मे रोजी लंडनकडे रवाना होईल. लंडनमध्ये १0५0 जण रिलेतून ही ज्योत फिरवतील व २७ जुलै रोजी उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्य स्टेडियमध्ये दाखल होईल.

ग्रीसच्या दक्षिण भागात असलेल्या अडीच हजार वर्षे जुन्या हेरा या प्राचीन काळातील भग्न मंदिरात सूर्याचे पहिले किरण आणि भिंग यांच्या माध्यमातून ज्योत प्रज्वलित करण्यात आली. प्राचीन ग्रीस पोशाखातील कलाकारांनी या वेळी नृत्य सादर केले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॅक रोगे आणि लंडन ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष सबेस्टियन उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi