म्यानमार येथे एका लेखकाला आपल्या लिंगवर माजी राष्ट्रपती यांच्यावर कविता लिहिल्यामुळे सहा महिन्याची शिक्षा ठोठावण्यात आली. माउंग सौंगखा याने ही कविता सोशल मीडिया फेसबुकवर पोस्ट केली होती. आपल्याला लिंगवर टॅटूद्वारे त्याने पूर्व राष्ट्रपती थिन सेन यांच्यावर कविता केली होती.
24 वर्षाच्या सौंगखावर कविता ऑनलाईन पोस्ट केल्यामुळे शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच शिक्षा झाल्यावर त्याला सोडण्यातही आले कारण तो आधीच सहा महिने कारागृहात होता.
त्याच्या गर्लफ़्रेंड ने सांगितले की ही केवळ काल्पनिक कविता होती, खरंतर असं कोणतंही टॅटू नव्हतं. सुमारे 50 वर्षाच्या लष्कराच्या शासनानंतर म्यानमार येथे मागील नोव्हेंबरमध्ये लोकशाही सरकार निवडून आली आणि लष्कराने अलीकडेच सत्ता लोकशाही सरकारच्या सुपूर्द केली आहे.
म्यानमार मध्ये अलीकडे सोशल मीडियावर आपले मत मांडणार्यांना कायदेशीर कारवाईला समोरा जावं लागले आहे.