Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरूख खानची परत लॉस एंजलिस विमानतळावर चौकशी!

शाहरूख खानची परत लॉस एंजलिस विमानतळावर चौकशी!
लॉस एंजलिस , शुक्रवार, 12 ऑगस्ट 2016 (10:57 IST)
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान याला पुन्हा एकदा अमेरिकेतील लॉस एंजलिस विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. शाहरूखने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली. काही तासांच्या चौकशीनंतर शाहरूखला सोडण्यात आले. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर काही तास बसवून ठेवले. त्यामुळे किंग खानने संताप व्यक्त केला. जगात विविध ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबाबतचे महत्त्व मला माहित आहे आणि मला आदर आहे. मात्र, दरवेळेस अमेरिकन इमिग्रेशन अधिकारी मला ताब्यात घेतात, ही गोष्ट खटकत असल्याचे शाहरूखने ट्वीटरवर म्हटले आहे. मात्र, या वेळेत काही पोकेमॉन पकडण्यात यश आले असल्याची मार्मिक टिप्पणीही शाहरूखने केली. या आधीदेखील २००९ आणि २०१२ साली शाहरूखला अमेरिकन विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी अडवले होते. न्यू जर्सी को नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २००९ साली शाहरुखला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी एक तास शाहरुखला कोणालाही फोन करू देण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावेळी शाहरुखचे नाव अलर्ट लिस्टमध्ये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुढे २०१२ या वर्षीही न्यूयॉर्क विमानतळावर शाहरूखला दोन तासांसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अमेरिकन कस्टस आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत तेव्हाही अशीच माफी मागितली होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मौजमजेसाठी गॅलरीतून खुलेआम गोळीबार!