Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेकडो तालिबान्यांचा थेट तुरुंगावरच हल्ला

शेकडो तालिबान्यांचा थेट तुरुंगावरच हल्ला

वेबदुनिया

PR
पाकिस्तानमध्ये लाहोरच्या पश्चिमेस सुमारे २०० मैलांवर असलेल्या डेराइस्माईल खान येथील शहरातील तुरुंगावर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला असून, पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जोरदार लढाई चालू असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. डेराइस्माईल खान येथील तुरुंगांमध्ये शेकडो तालिबानी कैदी असून पाकिस्तानमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या शहरामध्ये सुरक्षा दलांनी संचार बंदी घोषित केली होती. मात्र, हातबाँब व इतर शस्त्रांच्या सहायाने तालिबानी दहशतवाद्यांनी येथील तुरुंगावर जोरदार हल्ला केल्याचे सूत्रांनी सांगितले.

या तुरुंगामधील काही उच्चस्तरीय तालिबानी नेत्यांना सोडविण्यासाठी पाकिस्तानी तालिबानने १०० योद्धे व सात आत्मघातकी दहशतवादी यांच्या सहायाने येथे हल्ला केल्याची माहिती तालिबानी प्रवक्ते शहिदुल्ला शहीद यांनी दिली. या तुरुंगाच्या भिंती फोडण्यासाठी आत्मघातकी दहशतवाद्यांनी बाँबच्या सहायाने आत्मघात केला असल्याचे शहीद यांनी यावेळी सांगितले. या तुरुंगामधील सुमारे ३०० कैद्यांना मुक्त करण्यात आल्याचा दावाही शहीद यांनी यावेळी केला. या तुरुंगामध्ये सुमारे पाच हजार कैदी असून त्यांमध्ये सुमारे २५० कैदी हे पाकिस्तानी तालिबानशी संलग्न असलेल्या संघटनांमधील आहेत. पाकिस्तानमधील शेकडो शिया नागरिकांची हत्या करणा-या लष्कर-ए-झंघवी या संघटनेच्या दहशतवाद्यांचाही समावेश यामध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांचे गणवेश घातलेल्या सुमारे ४० दहशतवाद्यांनी वीजपुरवठा खंडित करण्यातही यश मिळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तालिबानी दहशतवाद्यांकडे लाऊडस्पीकर असून त्यांच्या सहका-यांची नावे त्यावरून ते पुकारत आहेत. आतापर्यंत काही दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, असे डेराइस्माईल खानचे प्रशासकीय अधिकारी मुश्ताक जादून यांनी सांगितले. पाकिस्तानमध्ये आज अध्यक्षीय निवडणूक होणार असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

तालिबान्यांनी ३०० कैदी पळवून नेले

इस्लामाबाद : तालिबानी अतिरेक्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली असून जवळपास ६० आत्मघाती अतिरेक्यांच्या गटाने पोलिसांच्या वेषात कारागृहावर हल्ला करून ३०० कैद्यांना पळवून नेल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी उशिरा रात्री ही घटना घडली.

Share this Story:

Follow Webdunia marathi