Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रद्धांजली वादाच्या भोवर्‍यात!

श्रद्धांजली वादाच्या भोवर्‍यात!
रियाध , गुरूवार, 29 जानेवारी 2015 (08:54 IST)
सौदी अरेबियाचे दिवंगत राजे किंग अब्दुल्ला यांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी हेडस्कार्फ शिवाय वाहिलेली श्रद्धांजली वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. किंग अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहण्यापूर्वी विमानतळावरही मिशेल आपल्या नेहमीच्या पोशाखात होत्या. सौदी अरेबियात महिलांनी डोके आणि चेहरा झाकलेल्या अवस्थेत म्हणजे निकाब घालून रस्त्यावर उतरण्याचा कायदा आहे. पण, परदेशातील महिलांना फक्त हेडस्कार्फ पुरेसे आहे. मिशेल ओबामा यांनी आपल्या नेहमीच्या पोशाखात किंग अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहिल्याने वादाला सुरवात झाली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi