Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरबजीतची नव्हे सुरजीतची होणार सुटका!

सरबजीतची नव्हे सुरजीतची होणार सुटका!

वेबदुनिया

इस्लामाबाद , बुधवार, 27 जून 2012 (10:59 IST)
WD
गेल्या 20 वर्षांपासून साखळी बॉंबस्फोटातील सहभागाच्या आरोपावरून तुरुंगात फाशीच्या शिक्षेची टांगती तलवार डोक्‍यावर असलेल्या भारताच्या सरबजित सिंगची शिक्षा पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी रद्द केल्याचे पाकिस्तानने मंगळवारी दुपारी जाहीर केले. मात्र फाशी सरबजीतची नव्हे तर सुरजीत सिंगची रद्द केल्याचा खुलासा पाकिस्तानचे राष्ट्रपती आसीफ अली झरदारी यांच्या कार्यालयाने रात्री केला.

सरबजीतची फाशी रद्द झाल्याचे वृत्त आज दिवसभर आठ तास वाजले. मोठा जल्लोषही झाला. हे सर्व होत असताना पाकनेही त्यावर कुठले भाष्य केले नाही. मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास या आनंदावर पाकनेच विरजन टाकले. सरबजीतच्या सुटकेचे वृत्त झरदारींचे प्रवक्ते फरहतउल्ला बाबर यांनी फेटाळले. फाशी सरबजीतची कायम आहे. १९८९ साली फाशीची शिक्षा झालेल्या सुरजीत सिंगची सुटका करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

1990मध्ये पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात झालेल्या साखळी बॉंबस्फोटांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सरबजितवर झाला होता. या साखळी स्फोटांमध्ये 14 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आपण निर्दोष असून, चुकून अटक करण्यात आल्याचा दावा सरबजित यांनी सातत्याने केला होता. इतकेच नव्हे, तर अटकेनंतरही सरबजितविरुद्ध "एफआयआर'ही दाखल करण्यात आलेला नाही. सरबजित सध्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात आहेत.

सरबजीतच्या दया अर्जावर राष्ट्रपती झरदारी यांनी त्याच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले. त्यानुसार कायदामंत्री फारूक नायेत यांनी गृहमंत्रालयाच्या नावे एक नोट जारी केली. सरबजीत सिंगने जन्मठेपेच्या शिक्षेचा कालावधी याआधीच पूर्ण केला आहे. त्यानुसार सरबजीत केव्हाही सुटू शकतो, असे वृत्तसंस्थांनी म्हटले आणि त्यावर विश्‍वास ठेवत सरबजीतच्या कुटुंबीयांनी दिवाळी साजरी केली. मात्र त्याची वाट पाहणे अजून सुरूच राहणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi