Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्केटिंग करणारी शेळी गिनीज बुकात

स्केटिंग करणारी शेळी गिनीज बुकात
, मंगळवार, 21 एप्रिल 2015 (12:11 IST)
मुक्या प्राण्यांनाही मानवाप्रमाणे प्रशिक्षण मिळाले तर तेसुद्धा चकीत करणारी कमला दाखवू शकतात. असे प्रशिक्षण मिळालेल्या सर्कसीतील प्राण्यांच्या अनोख्या करामती आपण अनेकदा पाहिल्या असतील. मात्र फ्लोरिडातील ही शेळी याबाबतीत सर्वांना सरस ठरली आहे. आपल्यातील अद्भुत कौशल्यामुळे तिचे नाव थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पोहचले आहे.

या शेळीला असे कौशल्य अवगत आहे, जे दाखवताना भलभले धडपडतात. ही हॅपी नावाची शेळी चक्क स्केटिंग करते. नायजेरयिन प्रजातीच्या या शेळीने काही दिवसांपूर्वीच ही विक्रमी कामगिरी करताना अवघ्या 25 सेकंदांमध्ये 118 फुटांचे अंतर पार केले. एखाद्या शेळीने स्केटिंग बोर्डावरून पार केलेले आतापर्यंतचे हे सर्वात जास्त अंतर आहे. अर्थात हॅपीला हे कौशल्य सहजासहजी अवगत झालेले नाही. तिला स्केटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी तिची 18 वर्षीय मालकीण मेलेडी कुकने मोठी मेहनत घेतली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi