Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हम बदला लेंगे : नवाज शरीफ

हम बदला लेंगे : नवाज शरीफ
इस्लामाबाद , गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (10:43 IST)
तालिबानी दहशतवाद्यांनी पेशावरमधील निष्पाप विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्लयाचा निषेध व्यक्त करुन ‘हम बदला जरुर लेंगे’ अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांनी सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ, असा इशारा त्यांनी दिला.
 
अशा भ्याड हल्याने पाकिस्तान मागे हटणार नसून  दहशतवादविरोधी मोहीम सुरुच राहिल, असे स्पष्ट करुन शरीफ म्हणाले,  सर्वपक्षीय सहमतीतून फाशीच्या शिक्षेवरील बंदी आम्ही  उठविली आहे. दहशतवादाविरुद्ध सात दिवसांत ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निश्चयही करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi