Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिलरी क्लिंटन यांच्यावर भिरकावला बूट!

हिलरी क्लिंटन यांच्यावर भिरकावला बूट!
लास वेगास , शनिवार, 12 एप्रिल 2014 (12:17 IST)
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्यावर एका संमेलनात एका महिलेने बुट भिरकावला. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच काळ्या-पिवळ्या रंगाचा बुटही जप्त केला आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ स्क्रॅप रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या एका  बैठकीत हिलरी क्लिंटन यांना आमंत्रित करण्‍यात आले होते. क्लिंटन लोकांना संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर आल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला. मात्र क्लिंटन यांनी आपले भाषण थांबविले नाही.उलट त्यांनी हा प्रकार हासणयावर नेला.

माझ्यावर कुणी काही फेकतंय का? सर्कस कलेतला हा एक भाग आहे का?` असे हिलरी यांनी म्हटल्यानंतर बॉलरूममध्ये एकच हशा पिकला.  हिलरी यांच्यावर बूट फेकणार्‍या महिलेची अधिक चौकशी सुरू आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi